गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा मराठी | Ganesh Chaturthi Wishes In Marathi

गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा मराठी २०२३ | Ganesh Chaturthi Wishes In Marathi 2023


गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा मराठी : दरवर्षी मोठ्या उत्साहाने आणि प्रेमाने आपण गणपती बाप्पाच्या आगमनाची वाट पहात असतो. यंदा सालाबाद प्रमाणे मंगळवारी, १९ सप्टेंबर, २०२३ रोजी बाप्पाचे आगमन होत आहे. हा दिवस आपण सर्व आनंदात साजरा करून, गणपती बाप्पाचे स्वागत करून बाप्पासाठी छान-छान मोदक आणि मिठाई, पेढे, लाडू, भोजन बनवतो.

त्याच बरोबर आज-काल सर्वचजण फेसबुक, इन्स्टाग्राम आणि वॉट्सएपवर स्टेटस आणि शुभेच्छा देऊन डीजीटली सण साजरे करतात. आणि त्या करताच आम्ही घेऊन आलोय काही निवडक खास तुमच्या पसंतीचे आणि आवडीचे Ganesh Chaturthi Wishes In Marathi जे तुम्ही आपल्या मित्रपरिवाराला शेअर करून त्यांचा आणि तुमचा दिवस आणखीन चांगला करू शकता. 

पोस्ट आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.


ganesh chaturthi wishes in marathi


गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी


श्रावण संपला, रम्य चतुर्थीची पहाट झाली….
सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे, आली आली….
गणाधिशाची स्वारी आली…
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 


बाप्पा आला माझ्या दारी शोभा
आली माझ्या घरी संकट घे देवा
तू सामावून आशीर्वाद दे भरभरून.
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथाबाप्पा मोरया रे ,
बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


माझं आणि बाप्पाचं खूप छान नात आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही.
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास घरात आहे
लंबोदराचा निवास दहा दिवस आहे
आनंदाची रास अनंत चतुर्थीला मात्र
मन होते उदास सर्व गणेश भक्तांना
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


कोणतीही येऊदे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
अशा आमच्या गणरायाला नमन
करितो जोडुनी दोन्ही हाथ.
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया
मंगल मूर्ती मोरया
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


श्रींच्या चरणी कर माझे जुळले,
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले,
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,
सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले,
अशीच कृपा सतत राहू दे…
सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


गजानन तू गणनायक.
विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक…..
तूच भरलासी त्रिभुवनी,
अन उरसी तूच ठायी ठायी….
जन्मची ऐसे हजारो व्हावे,
ठेविण्या मस्तक तूज पायी..
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


गणपती बाप्पा जे काही नशिबात
वाढवून ठेवले आहेस
ते फक्त सहन करण्याची
शक्ती दे
जय श्री गणेश..
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते.
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!



स्वर्गात पण जे सुख मिळणार
नाही ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे
बाप्पा तुझ्या नावातच समाधान आहे.
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


कैलासाहून बाप्पा तुझी सुटली
कारे स्वारी वाटेत कुठे राहू
नकोस सरळ ये घरी…
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!



वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ!
निर्विघ्नं कुरु में दैव, सर्व कार्येषु सर्वदा
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,
शांती, आरोग्य लाभो,
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!!
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


मला आशा आहे की या शुभ प्रसंगी या शुभेच्छा तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येतील!



Comments